मलाही वाटत सर....
मलाही वाटत सर....


मलाही वाटतं सर...
आपल्या शाळेत यावं..
पण रस्त्यावर फिरणाऱ्या
कोरोनाला कुणी रोखावं..
सॅनिटाईझर लावा, हात धुवा
आता नुसता वीट आलाय...
मोकळं खेळता येत नाही
श्वास माझा कोंडलाय...
"ऑनलाईन शाळा- शिक्षण"
मार्ग जोर धरतोय खरा....
अँड्रॉइड सेल, रेंज, आरोग्याचे
तळागाळापर्यंत चिंतन करा...
विनाशिक्षक- विद्यार्थ्यांविना
कशी असेल ऑनलाईन शाळा...?
खडु-फळा, पाटी-पुस्तकाविना
आकलनास बसेल हो आळा..
शाळेतील नैसर्गिक शिक्षणाचा
हक्क आमचा हिरावू नका...
शाळा उघडण्याची घाई करता
कोरोनाचा लक्षात घ्या धोका...
मास्क द्या, सॅनिटायझेशन करा
सुरक्षेच्या सर्व सोयी पुरवा...
उशिरा का होईना पण
आम्हांला शाळेतच शिकवा..
आम्हां बालचिमुकल्यांचा
शासनदरबारी विचार व्हावा..
आम्हालाही शाळेत यायचं
पण कोरोना जायला हवा...