STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

सोबत

सोबत

1 min
20

नको ना काढू आठवण
कसेसेच होतेय मला ग..!
कितीही ठरवले तरी
मन तुझ्याकडेच येतेय ग..!!

खूप दूर आलोय आता
मागे कसं मी वळायचं..!
सुगंध तुझा तनी - मनी
तुझ्याविना कसं दरवळाचं..!!

तू तिकडे मी इकडे
शब्दच काय दुवा आहे..!
आजन्म सोबत असावी
असा संग तुझा हवा आहे..!!

आक्रंदत म्हणतो हवं तर
मागणं तुझ्याकडे एक आहे..!
नको दुरावा अन अबोला
विरहाने मागत भीक आहे..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy