STORYMIRROR

Chandan Pawar

Classics

4  

Chandan Pawar

Classics

कितीदा नव्याने तुला आठवावे

कितीदा नव्याने तुला आठवावे

1 min
20

कितीदा नव्याने तुला आठवावे
ह्रुदयात पुन्हा तूच तू असावे..!
मिटलेल्या डोळ्यातही तूच असावी
की जागेपणी स्वप्नांनी मला फसवावे ?

तुझे ते गोड शब्द, नाजूक आठवणी
दरवळतात बनून नवी प्रेमकहाणी..!
तुझ्या सहवासातील ते मौलिक क्षण
जपून ठेवलाय हृदयी मनाच्या कोनी..!!

भांडणे, विव्हळणे प्रेमभाव म्हणतात
पण तुझ्या अस्तित्वखुणा शाश्वत असतात..!
पुन्हा एकदा तुला नव्याने भेटण्यासाठी
शब्दच शब्दांचा आधार बनतात..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics