STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

3  

Chandan Pawar

Tragedy

पुकार

पुकार

1 min
17

माझ्या प्रत्येक भावनेला
आसवांची धार होती..!
सखे माझी प्रेमभावना
एवढी भिकार होती..!!

खोट्या वासनांध दुनियेत
खऱ्याची शिकार होती..!
खरे खोट्याची जाणिवा 
नसलेली ती किती हुशार होती ?

खूप प्रेम करतो तुजवर
व्याकूळ मनाची पुकार होती..!
पण ती आधीच इतरासाठी
हृदयाने गर्भार होती..!!

खोट्या शब्दांना भुलण्याची
तिला फार घाई होती..!
बेगडी प्रेमाच्या मोहात
गुंतलेली ती नार होती..!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy