छावा
छावा


शरीराच्या चिंधळ्या होऊनही
ओठांवर त्यांच्या हसू होतं..!
स्वराज्यासाठी रक्ताचा सडा घातला
ते रक्त शिवरायांच्या छाव्याचं होतं..!!
आकाशनेही डोळे घट्ट मिटले
छ्त्रपती शंभूराजांचे घाव बघुन..!
ओलीचिंब झाली वसुंधरा ती
रक्ताच्या थारोळ्यात न्हाऊन..!!
इंद्रायणी रडू लागली अखेर
पाहून आमच्या छत्रपतीचे हाल..!
तरीही मागे हटलाच नाही
आमच्या शिवाजी राजांचा लाल..!!
गगनभेदी ती सिंहगर्जना
गनिमांच्या काळजाला सांगत होती..!
एक संभा गेला तरी, लाखो
जन्मतील महाराष्ट्राच्या पोटी..!!
धर्मासाठी पंचप्राण त्यागिले
परी झुकल्या नाही नजरा..!
अशा धर्माभिमानी ,धर्मवीर राजांना
या चंदनचा मानाचा मुजरा..!!