दिवाना
दिवाना


तुझ निरागस हास्य
तुझा चंचलपणा..!
लहान मुलासारखा
तुझा तो नटखटपणा..!!
कोण आहेस तू
माहित नव्हते मला..!
हरवून गेलो मी
जेव्हा पाहिले तुला..!!
बागेतील फुलेही लाजतील
इतकी आहेस सुंदर तू..!
पाहताक्षणी तुला
माझ्या मनात बसलीस तू..!!
तुला कितीही बघितलं
तरी मन माझ भरत नाही..!
कविता केल्याशिवाय
मला जराही राहवत नाही..!!
सुंदर वाटते जग हे
जेव्हा तू हसतेस..!
प्रत्यक्षात कमी पण
स्वप्नात नेहमी दिसतेस..!!
गम्मत करण्याची
तुला आहे खूप खोड..!
बोलणेही तुझे आहे
तुझ्यासारखेच गोड..!!
जादू आहे तुझ्यात
भलताच दिवाना मी तुझा..!
बोलतेस तू जेव्हा
मी राहत नाही माझा..!!
तू तर आहेस
नसानसात माझ्या..!
देशील का जागा थोडी
मला हृदयात तुझ्या..!!