ध्यास
ध्यास
सखे,शब्दांच्या पलीकडे
जाऊन कधीतरी वाच मला..!
न सांगता येणाऱ्या भावनांचा
अर्थ तेव्हाच कळेल तुला..!!
तुझ्या असण्यानेच पूर्ण होते
माझी ही अपूर्ण कहाणी..!
तू फक्त माझे अस्तित्व नाहीस
तर आहेस जगण्याची निशाणी..!!
कधी अबोला - दुरावा तर
कधी शब्दांचा पाऊस असतो..!
पण प्रत्येक वळणावर फक्त
तुझ्यासोबतचा ध्यास असतो..!!
मिळाले जरी सारे सुख , ते
असेल सर्व एका बाजूला..!
तरी तुझ्या एका शब्दापुढे
नेहमीच फिके वाटेल मला..!!
