तर खरचं मला सोडून दे..!!
तर खरचं मला सोडून दे..!!


माझं प्रेम समजायचे असेल
तर एकदा मला मिठीत घे..!
नाही वाढले हृदयाचे ठोके
तर खरचं मला सोडून दे..!!
माझ्या प्रेमस्पर्शाने होईल जादू
प्रेमानुभव तो मला घेऊ दे..!
मिठीत नाही हरपल भान तुझही
तर खरचं मला सोडून दे..!!
डोळे तुझे सागर प्रेमाचा
एकदा डुंबून मला जाऊ दे..!
नाही हरवलीस डोळ्यात माझ्याही
तर खरचं मला सोडून दे..!!
तुझ्या हसण्यात मिळतो आनंद
माझं दुःख मला विसरू दे..!
नाही मिळाला आनंद माझ्या प्रेमाने
तर खरचं मला सोडून दे..!!
तुझ्या प्रेमाच्या पुस्तकातले पान
मला एकदा मनापासून वाचू दे..!
नाही पडलीस माझ्या प्रेमात
तर खरचं मला सोडून दे..!!