तुझ्यासाठी...
तुझ्यासाठी...


माहितेय तुला सखे
तुझ्यासाठीच तर मी थांबलोय..!
सांग ना तूच मला तुझ्याविना
मी आयुष्य कुठे जगलोय..!!
स्वप्नांना उराशी बांधून
मी वाट तुझी पाहतोय..!
माझ्या नभातला चंद्र
मी तुझ्यासाठीच शोधतोय..!!
दिनरात हा जीव वेडा
सखे तुझ्यासाठी झुरतोय..!
तुझा नकार असूनही
तो तुझ्यावरच मरतोय..!!
प्रत्येक श्वासासोबत मी
हृदयात तुला जपतोय..!
लक्षात ठेव हा श्वास मी
सखे तुझ्यासाठीच भरतोय.!!