फुलमाळी
फुलमाळी
स्त्रीशिक्षण नाकारलेल्या व्यवस्थेशी
लढून मुलींची पहिली शाळा उघडली..!
मग स्त्री/ मुलगी चूल व मूल सोडून
आनंदाने शाळेत शिकू लागली..,!!
दगड - गोटे, शेणाचा मारा सहन करत
सावित्रीमाई मुलींना शिकवू लागल्या..!
तरी त्यांचा त्याग विसरून आजच्या
स्त्रिया व्रत उपवास करू लागल्या..!!
जरा विचार करा, स्त्रियांचा शिक्षणवृक्ष
असा कधीच फळला-फुलला नसता..!
जर ज्योतिबा फुले नावाचा फुलमाळी स्त्रीशिक्षणासाठी झिजला नसता..!!
