मुखवट्यांच्या या वास्तवात...
मुखवट्यांच्या या वास्तवात...
एखाद दिवशी केलीच कोणी मदत
तरी उरलेल्या दिवसात
आपलं आपल्यालाच आवरावं लागतं..
मुखवट्यांच्या या वास्तवात
ज्याचं त्यालाच सावरावं लागतं..
भूतकाळाच्या आठवणी
मनात घर करून बसलेल्या असतानाही
पुढे मात्र जावंच लागतं,
मुखवट्यांच्या या वास्तवात
ज्याचं त्यालाच सावरावं लागतं..
प्रसंगी माघार घ्यावी लागते,
पण त्याच माघारीतून पाऊलवाट काढत
स्वतःच पुन्हा उभं राहावं लागतं..
मुखवट्यांच्या या वास्तवात
ज्याचं त्यालाच सावरावं लागतं..