तुझ्यावरच प्रेम...
तुझ्यावरच प्रेम...


चेहऱ्यावरचं गोड हसू जेव्हा नजरेत व्यक्त होतं
ते आहे तुझ्यावरच प्रेम..
माझं एखादं कोड जेव्हा तुझ्यामुळे सहज उलगडल्या जातं
त्यात आहे तुझ्यावरच प्रेम..
उदास असल्यावर ज्याच्या फक्त विचारानेच छान वाटू लागतं
त्यात आहे तुझ्यावरच प्रेम..
आणि एवढं असूनही कधीकधी शब्दांतही जे व्यक्त होत नाही
ते आहे तुझ्यावरच प्रेम...