स्त्री अस्तित्व..
स्त्री अस्तित्व..


सगळ्यांसाठी तिळ-तिळ तुटावं तिने,
मन मारून जगावं तिने,
परंतु, योग्य की अयोग्य
ह्या साच्यात मात्र
तिनेच दरवेळी उभं राहावं..
कदाचित ह्यालाच स्त्री अस्तित्व म्हणावं...
चुकून कधी स्वतःसाठी लढावं
तर तिला लगेच माघार घ्यायला लावावं..
डोळ्यात अश्रू अनावर होऊनही तिने,
चेहऱ्यावर कायमच स्मितहास्य आणावं..
कदाचित ह्यालाच स्त्री अस्तित्व म्हणावं...
ures: normal; font-variant-caps: normal; font-weight: 400; letter-spacing: normal; orphans: 2; text-align: left; text-indent: 0px; text-transform: none; white-space: normal; widows: 2; word-spacing: 0px; -webkit-text-stroke-width: 0px; background-color: rgb(255, 255, 255); text-decoration-style: initial; text-decoration-color: initial; display: inline !important; float: none;">कधी जन्माआधी तर कधी जन्मानंतर
आयुष्य नावाच्या समुद्रात,
स्वतःच मीपण सोडून विलीन होतांना,
तिला सतत नाकारल्या जावं..
कदाचित, ह्यालाच स्त्री अस्तित्व म्हणावं...