बालपण
बालपण


गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी,
गल्लीतुन फिरायचो, आम्ही तेव्हा अनवाणी.
पावसाची रडायचो, बाहुलीसाठी भांडायचो,
पण हेच भांडण तेव्हा, दोन मिनीटात विसरायचो.
खुप मस्ती करायचो, पावसात देखील भिजायचो,
पण आईला त्रास दिल्याशिवाय,कधी नाही रहायचो.
दारातील रांगोळी पुसायचो,आणि नाही म्हणून सांगांयचो,
पण आईचा एक धपाटा, बसल्यावर खरं मात्र बोलायचो.
गेलं ते बालपण, राहिली ती आठवण,
खूप गोष्टींची झाली आहे साठवण,
आता मित्रांची घेऊ वाटते भेटपण,
म्हणजेच
पुन्हा एकदा जुळून येईल बालपण.