एक मैत्रीण असावी
एक मैत्रीण असावी


एक मैत्रीण असावी जी काही न बोलता मनातील सारं समजून जावी,
एक मैत्रीण असावी जी शांत राहीलं की मनातील घालमेल समजून जावी.
एक मैत्रीण असावी जी संकटात न सांगताही मदतीला धावून यावी,
एक मैत्रीण असावी जी सर्व सुखदुःखात माझ्या सोबत असावी.
एक मैत्रीण असावी जी पाहताक्षणी डोक्यातील विचार समजून जावी,
एक मैत्रीण असावी जी दु:खात तसेच आनंदातही माझ्या पाठीशी असावी.