जशास तसे
जशास तसे
एक गावात रामु नावाचा माणूस राहत होता. त्याला एक मुलगा होता पण तो परदेशात राहत असल्यामुळे गावात रामु एकटाच राहत होता.काही दिवस उलटले. नंतर मुलांचं पत्र आलं. त्यानं रामुला काही दिवस राहण्यास बोलवलं. रामु तयार झाला. तो खुप उत्सुक होता.रामु परदेशात गेला तिथे त्यांचा मुलगा राहत होता. मात्र वडिलांस त्याने जवळच असलेल्या पण वेगळ्या घरात ठेवलं.
मुलाचं सगळं वागणं त्याची मुल बघत होती.अशीच अनेक वर्षे उलटली. त्या मुलाचं देखील आता वय झालं होतं. नंतर त्यांच्या मुलांनीही त्यांच्यासाठीही एक नवीन घर बांधल. आणि त्यालाही त्या वेगळ्या घरात ठेवलं.
बोध: आपण जसे वागतो त्याचेच अनुकरण आपली मुल करतात.
