STORYMIRROR

Ankita Khadake

Inspirational

3  

Ankita Khadake

Inspirational

कोविड-१९

कोविड-१९

1 min
11.4K

लॉकडाऊनमुळे झाली सगळीकडे नाकाबंदी,

घरीच राहण्याची मिळाली अनमोल संधी


रस्त्यावरील वाहनांची गर्दी झाली गप्प,

दुकाने, बाजारपेठा सर्वत्र झाल्या ठप्प


एका गावाहून दुसऱ्या गावी जाणे झाले बंद,

व्यापार, उद्योगधंदे सर्वत्र झाले मंद


रस्त्यावरील माणसांची गर्दी झाली कमी,

व्हायरस कमी होण्याची सर्वांनी दिली हमी


पोलीस, डॉक्टरांनी बजावले चांगले काम,

व्हायरसला हरवण्याचा निश्चय केला ठाम


सर्वांनी केले सोशल डिस्टन्सिंगचे पालन,

एकमतानं ठरलं व्हायरसच्या विरोधात चालन


नियमांचे पालन करणे एकमताने ठरवू,

एकजुटीने सर्वजण कोरोना व्हायरसला हरवू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational