खेळखंडोबा शिक्षणाचा
खेळखंडोबा शिक्षणाचा


कचरा गेला डोळ्यात,
म्हणून ते रडणं होत नाही.
मरेपर्यंत आयुष्य ओढत नेलं,
म्हणून ते जगणं होत नाही.
करायचा म्हणुन अभ्यास केला,
तर ते ज्ञान होत नाही.
प्रापर्टी आहे म्हणून उगाच शिकलं,
तर ते शिक्षण होत नाही.
वाचायचं म्हणून वाचल तर,
काहीच लक्षात राहत नाही.
जर तेच मनापासून वाचल तर,
ते कधीच विसरत नाही