निसटून गेले
निसटून गेले


जगणे कोणी ठरवावे
हातात गवसले ते आवरावे
ठेवावे शिदोरीत क्षण आनंदी
सोने करावे मिळतील संधी
निसटून गेले हातून मोती
दुःख तयाचे कुठवर करावे
कुरवाळत बसुन तयाला
पाऊल पूढे कसे टाकावे
जिवन नश्वर असे कटू जरी
जगणे आपल्या हाती आहे
तेल संपले जरी दिव्यातील
वाती अजून ही शाबूत आहे
नवे विचार रूजवत जावून
वर्तमान हा जगत रहावा
जगण्याच्या या वाटेवरला
अडसर दूर सारत जावा