रंग प्रेमाचा
रंग प्रेमाचा
रंग कोरडा वाटला
जीव एकटा असता
खुले गालावर खळी
दोन पाखरे दिसता
गुजगोष्टीत गुंतले
दोन जीव एकांतात
नसे भान त्या जगाचे
लडीवाळ भांडतात
सखा एकटा असावा
हिच मनात आकांक्षा
त्यास एकटे पाहता
उधळती रंग दिशा
बोल ऐकत रहावे
वाटे मनोमन सदा
भाव टिपत रहावे
अवखळ त्याच्या अदा
त्याच्या प्रेमाचा सुगंध
दरवळे भोवताली
देहभान विसरून
निरखते हालचाली
गेले रंगात रंगुनी
शाम माझा मी राधिका
त्याच्या प्रेमाचीच आस
मी त्याचीच साधिका

