प्रेमाचा रस्ता
प्रेमाचा रस्ता
तुझं माझं प्रेम शब्दात रेखाटू कसे
नको वाटते त्याचे व्हायला कधी हसे
झालेच कधी खट्टू तर माझा
रुसवा तुझ्या काळजात ठसे
माझ्या मनातले घडावे म्हणून
तू कायम हट्ट करून बसे
संसाराचा रथ ओढतानाची
काळजी तुज चेहऱ्यावर दिसे
समस्यांना सोडवताना नेहमी
तुझ्या गालावर हास्य वसे
वर्तमानात जगताना भविष्याची
कधीच चिंता तुज नसे
भविष्याचा अंदाज घेत तुझे
पाऊल पुढे पडत असे
हाच तो प्रेमाचा रस्ता ज्यावर
चालताना तुच सोबत दिसे

