प्रेम भरलेला प्याला
प्रेम भरलेला प्याला
निजताना सय तुझी
आली गालावर लाली
खुदकन हसताना
काय घडले म्हणाली
काय सांगू काय झाले
फुटले मनात लाडू
त्याची जादूचं निराळी
कसे मनीचे मी ताडू
त्याचा मोकळा स्वभाव
माझी होते घाल मेल
कधी अबोला संपूर्ण
कळी माझी उमलेल
घेतो सावरून मला
तरी घाबरतो जीव
माझ्या भ्याडपणाची
वाटतसे मज किव
समजावं ते मनाला
नको करू असा त्रागा
तुझ्या हातातच आहे
सुखी संसाराचा धागा
ठेव विश्वास जरासा
बघ निरखून त्याला
त्याच्या शब्दांचा ओसंडे
प्रेम भरलेला प्याला

