माझी स्वप्न
माझी स्वप्न
माझी स्वप्न माझा ध्यास
सारच झालय आता बास
काम न करता बसून कोणी
भरवणार आहे का घास
सामान्यासारखा सामान्य मी
कोण म्हणतं तू आहे खास
भिरभिरत असतात नजरा
अन चालतो मोठ्याने श्वास
एकटेपणाच करतो सोबत
हाती असतो तोच ग्लास
वरवर आपुलकी दाखवण्याची
पद्धत मात्र साऱ्यांची क्लास
दिवसा मागून दिवस सरतो
पैशांची साठवतो रास
अध्यात्माच्या नावाखाली
हात जोडतो होऊन दास
किंमत ना उरते इच्छांना
गळ्यात पडतो तेव्हा फास
मुक राहुनी सोसला जातो
घडी घडीला तेव्हा त्रास
