तोरण
तोरण
शुभ शकुनांची नांदी
दारी तोरण सजवा
सकारात्मक भावानं
टाळ मृदुंग वाजवा ||१||
फुला पानांचे तोरण
शोभे चौकटीस खास
प्रफुल्लित लक्ष्मी माता
घरी सदा तिचा वास || २||
सदाबहार तोरण
स्वागतास सज्ज असे
एक अनोखा उत्साह
प्रत्येकाच्या मनी ठसे ||३||
वाढे वैभव सणांचे
ऊर्जा मंगल सात्विक
लक्ष दिव्यांचे तोरण
शुभ शक्तीचे प्रतीक ||४||
तोरणांची सजावट
मना तृप्ती देत असे
कृतकृत्याचा कलश
सुख शांती तेथे वसे ||५||
