STORYMIRROR

Supriya Devkar

Abstract Classics

4  

Supriya Devkar

Abstract Classics

जोडवी

जोडवी

1 min
316



अलंकार हा पहिला 

आला घेऊनीया सखा 

सात जन्माचे बंधन 

असे संसार नवखा ||१||


नववधू सजलेली 

चुडा हातात काचेचा 

शोभे पायात जोडवी 

अलंकार सौभाग्याचा ||२||


नक्षीदार वेढण्यांनी

वाढे पायाचीच शोभा 

समतोल शरिराचा 

राखण्यास मिळे मुभा ||३||


दागिना हा शृंगारात 

वाढवितो किती भर 

पती पत्नीतला दुवा 

काळजात करी घर ||४||


नाते प्रेमाचे वाढण्या 

येतसे अधिक मास 

परंपरांना जपण्या 

घालूया जोडवी खास ||५||




Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract