वसुंधरा
वसुंधरा
मोहरली फांदी फांदी फळे रुजली त्यावर
पाण्यातून डोकावत रोज पाहते अंबर
गंध फुलांचा पसरे बहरले रानमाळ
पाखरांची किलबिल माझे मंदिरात टाळ
पहाटेचा गार वारा घोंगावतो माळावर
सूर्यकिरणाचे तेज चमकते भाळावर
वसुंधरा सजलेली जशी लावण्याची खाण
तिच्या रूपात बसले साऱ्या सृष्टीचे हे दान
लावा ललाटीस टिळा घ्यावे एक मुखी नाम
वृक्ष लावून करुया संवर्धनाचे हे काम
