ध्यास
ध्यास
निराशेच्या जगतात
का राहावे लटकून
आयुष्याची मरगळ
देऊ आता झटकून||१||
नव्या रंगांची पहाट
घेऊन येईल स्वप्न
सोडून देऊया सारे
पडद्याआड लपणे||२||
लावू पंख मखमली
उंच घेऊया भरारी
ठेवा जपा विश्वासाचा
मीटेल काळजी सारी||३||
करूया संकल्प नवे
मार्ग पुन्हा शोधण्यास
या उज्वल भविष्याचा
मनी धरुयात ध्यास ||४||