पदर (मासिक पाळी)
पदर (मासिक पाळी)
फुलावर बागडणारे
माझे इवले पाखरू
आई म्हणून तुजला
किती ग मी सावरु
कोवळे तुझे वय
अल्लड तुझा स्वभाव
थरथरे मन माझे
काळजाला त्या ठाव
हळूहळू कळीला
वाटू लागलेय बहरु
धाकधूक वाढली
आता मी काय करू
येताच पदर तिजला
अस्वस्थ वाटे मजला
शब्दात कोणत्या सांगू
काय घडले तिजला
बाईपणाची चाहूल
हिच आहे ग सखे
वाटेल तुजला सारे
हे काय आहे नवखे
ओशाळू नकोस आता
विचार हवे ते मज
सांगते बाईचे निराळेपण.
गाठी बांधून ठेव आज
जा हसतहसत सामोरी
होणाऱ्या बदलांना
चार दिवसांची वेदना
पाळ स्वच्छतेच्या नियमांना
आहोत सोबती आपण सारे
नको संकोचून जाऊ
हि तर निसर्गाची देण
गोडवे आपण त्याचे गाऊ
