STORYMIRROR

Supriya Devkar

Classics Inspirational

4  

Supriya Devkar

Classics Inspirational

लेक

लेक

1 min
231

माऊलीच्या उदरात 

उमलली कळी छान 

निरागस रूप तिचे 

जणू नक्षत्रांची खाण||१||

गोड गोजिरी देखणी 

कन्या डुलते खुशीत 

मायबाप थोर तिचे 

घेती आनंदे कुशीत||२||

पालकत्व स्वीकारले 

मनापासून कळीचे 

किती मानावे आभार 

जन्मदात्या जननीचे||३||

लेक सावली बापाची 

नव चैतन्याची धारा 

तिचा वाटतो आधार 

आवरताना पसारा||४||

मोठी होईल लाडकी 

दिशा दाखवूया चला 

जग अनोखे पाहण्या 

झेप घेऊ द्यावी तिला||५||

लेक तळपता तारा 

तिला धाडसी करूया 

धडे शिकत शौर्याचे 

बळ पंखात भरुया||६||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics