साहेब...
साहेब...


साहेब, तुम्हाला निरोप देताना
समस्त जनता हेलावली होती;
पत्थरासम माणसांच्या डोळ्यांतही
आसवं थिजली होती
भाजप-कमळाची वाहती गंगा
आपण गावोगावी आणली होती;
तुमच्या नावाची जादू तेव्हा
सर्वांनी अनुभवली होती
कपटी व धुर्त दुर्जनांना तुमच्या
जीवनात थारा नव्हता;
एक वचनी-एक बाणी असा
माणसांत तुमचा दरारा होता
आले किती गेले किती?
तुमच्यापुढे तुकवीत माना;
दगा देणारे एकटे पडले
दारोदारी झिजवीत वाहणा
तोंडामधल्या प्रत्येक शब्दाला
टाळ्या घेणारे तुम्ही होतात;
मुर्दाड झालेल्या व्यवस्थेला
जाग आणणारे एकमेव होतात
सरणावरती देह असता
रुबाब मात्र तोच होता;
तेजस्वी काया-मायेचा भाव
तेव्हाही शाबूत होता
चेहऱ्यावरचा करारी भाव
आता पुन्हा दिसत नाही;
भेदक डोळ्यांमधली जरब
आता असत नाही
आवाजातला कणखरपणा
आता कायमचा शांत झाला;
असं वाटतं माणसातील
माणुसकीचा कणा मोडून पडला
अशी शान असा रुबाब
पुन्हा कधी असणार नाही;
राज-समाजकारणातला
वाघ पुन्हा दिसणार नाही