पाऊसधारा...
पाऊसधारा...
सरीवर सरीने कसं
तुझ सौंदर्य खुलवलं..!
तुझ्या सौंदर्यापुढे तू
पावसालाही नमवलं..!!
तेजस्वी सुंदर चेहऱ्याचा
थेंबालाही मोह जडला..!
तुझ्या अंगावरून वाहतांना
थेंब थेंबही मागे दडला..!!
अलगद तुझ्या चेहऱ्यावरून
थेंब थेंब झिरपत आले..!
माझ्यासमोर चक्क त्यांनी
तुला ओलेचिंब केले..!!
एकदा तुला मिठीत घेऊन
चिंब चिंब भिजायचं आहे..!
थेँबासारख कायम तुझ्या
रोमारोमात भिनायचं आहे..!!
तू झेल सखे तुझ्या देहावर
कोसळणाऱ्या पाऊसधारा..!
मी पण टिपतो प्रत्येक क्षण
फुलवून शब्द पिसारा..!!

