STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy

4  

Chandan Pawar

Tragedy

सल

सल

1 min
10

तुझी आठवण येते जीवघेणी
ती तुलाही येते का?
तुझे शब्द पडतात कानी
ते तुला ही ऐकू येतात का?

तू दिलेल्या जखमा मनाला
तुलाही सलतात का?
तू दिलेल्या वेदना हृदयाला
तुलाही कधी होतात का?

विरहाच्या अग्नीत जळतो मी
त्या तुलाही जाळतात का?
तू दिलेले अविरत अश्रू 
तुझ्या डोळ्यात येतात का?

तू दुर्लक्षलेलं मन माझे
हे तुझ्या लक्षात येते का?
शेवटी एवढंच म्हणेन मी
मी जे अनुभवलं तुझ्याकडून
ते तू ही कधी अनुभवशील का?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy