कटाक्ष..
कटाक्ष..
गोड गाल किती मऊ
सौंदर्याची खाण तू..!
गोरा गोरा रंग तुझा
जणू स्वर्गातील अप्सरा तू..!!
नशिले डोळे तुझे
गुलाबी ओठ रसाळ..!
स्मित हास्याने का करते
तू मला घायाळ ..!!
नको असे केस मोकळे सोडू
जीव घायाळ होतो माझा..!
तो कटाक्ष तुझ्या नजरेचा
इथे जाळ होतो माझा..!!
नको बघू असे
तिरक्या नजरेने मला..!
एकच हृदय आहे माझे
कितीदा चोरशील त्याला..!!
मी कैदी तुझ्या प्रेमाचा
मला हृदयाचा कारावास दे..!
मिळावी अखंड जन्मठेप
असा सहवास दे..!!