STORYMIRROR

Chandan Pawar

Tragedy Others

3  

Chandan Pawar

Tragedy Others

माझिया प्रियाला प्रीत कळेना..

माझिया प्रियाला प्रीत कळेना..

1 min
17

मिळतात पाखरे जशी चोरून प्रेमाने

वाटे लाभावे प्रेम असे नशिबाने..!

पण नशीबाची किमया माझ्याकडे वळेना 

कारण माझिया प्रियाला प्रीत कळेना..!!


 चेहरा तुझा मी कसा ग विसरू

मनातील भावनांना कसा ग आवरू..!

तुझ्या आठवणीत डोळे माझे भिजतात

हृदयातले प्रेमभाव हृदयीच थिजतात..!!


किती मी माझ्या मनाला समजावू

तुझी आणखी किती काळ वाट पाहू..!

अतृप्त मन माझे तुझ्याविना भरतच नाही

माझ वेड प्रेम तुला कळतच नाही..!!


प्रिये,मन गुंतायला वेळ लागत नाही

मन तुटायलाही वेळ लागत नाही..!

वेळ लागतो गुंतलेल्या भावनांना आवरायला

अन् तुटलेल्या मनाला सावरायला..!!


दे दुःख कितीही मला

हृदयातील प्रत्येक ठोका अर्पितो तुला..!

इच्छा तर माझ्या आहेत खूप

पण तुझ्या नकाराने बसलोय चूप..!!


शेवटी प्रेमाचा अर्थ साऱ्यांनाच कळतो

प्रेमवाटा मात्र थोड्यांनाच मिळतो..!

म्हणूनच मला नेहमी प्रश्न पडतो

आपण उगीच प्रेमाच्या मागे पळतो..!!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy