मराठी नववर्ष...
मराठी नववर्ष...
1 min
3
चैत्र प्रतिपदेच्या शुभ दिनी
मराठी बाणा जपू या..!
सुख-समृद्धीची,निरामय अशी
सुसंस्कारांची गुढी उभारू या..!!
राग, द्वेष, मत्सर, असूया
काढूनी दुर्गुणांचे विकल्प..!
मानवतेची ज्योत पेटवून करू
मराठी नववर्षाचा संकल्प..!!
हर्ष-आपुलकी-उल्हासाने भरू
जीवनी प्रीतीचे सुखदरंग..!
एकजूट-एकता-एकात्मतेची
सर्वजण शपथ घेऊ अभंग..!!
नम्रता-आत्मनिर्भरता-सहकार्याने
व्हावी आपली हरेक कृती..!
शिवराय- शंभूराजेसम सकल
हिताने जपू हिंदू संस्कृती..!!
"इडा-पिडा टळावी" साकडे
ईश्वरास करुनी भावपूर्ण वंदन..!
गुढीपाडवा-मराठी नववर्षाची
शब्दसुमने सकलास अर्पितो "चंदन"..!!