Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Chandan Pawar

Others

3  

Chandan Pawar

Others

बापू..

बापू..

1 min
8


माणसांतील देवमाणूस 

आम्ही तुमच्यात पहिला..

आज तुमच्या आठवणींचा

मागोवा तेवढा राहिला..


       तुमची त्यागी- समर्पित वृत्ती

       आज पुन्हा पुन्हा आठवते..

        परिवारातील सर्वांच्या मग

       डोळ्यांत पाणी साठते ..


असा क्षण नव्हता जो

तुम्ही स्वाभिमानाने जगला नाही ..

असत्याचा घोट तुम्ही

आयुष्यात कधीच पिला नाही..

   

       कपटी व धूर्त दुर्जनांना तुमच्या

       जीवनात थारा नव्हता..

      एक वचनी- एक बाणी असा

      मानी तुमचा स्वभाव होता..

        

तुमच्या ठायी कधीच

 नव्हते काही हेवे- दावे..

 म्हणून आम्हां सर्वांना वाटते

 तुम्ही असायला होते हवे ..


           क्षण असा आला

          काळ तुम्हांला घेऊन गेला..

          फार मोठी पोकळी

          कायमची देऊन गेला..


  जरी आमचे सर्वस्व नेले

  भयाण त्या लाटेने ..

  आम्ही वाटचाल करू

  तुम्ही दाखवल्या वाटेने ..


Rate this content
Log in