मैत्री
मैत्री
1 min
6
तुझ्या माझ्या मैत्रीची
अविस्मरणीय भेट
इथे संपर्क असतो
पहा हृदयाशी थेट||१||
एका वळणावरी केला
सुरु मैत्रीचा प्रवास
अनमोल जीवनात
होता मैत्रीचा सहवास||२||
हसत खेळत राहिलो
मैत्रीच्या प्रत्येक क्षणात
अविस्मरणीय भेटी
फक्त राहिल्या मनात||३||
येते सदैव आठवण अशी
कायम आपल्या मैत्रीची
आस लागली मनाला
तुझ्या प्रेमळ भेटीची||४||
आजही वाटे मनाला माझ्या
व्हावी अविस्मरणीय भेट
जेव्हा हृदयाचा होई असा
अगदी हृदयाशी संपर्क थेट||५||