Chandan Pawar

Romance

3  

Chandan Pawar

Romance

प्रेम...

प्रेम...

1 min
15


डोळ्यांनी डोळ्यांना

उमजणारी भाषा..!

प्रेम म्हणजे प्रेमच

हृदयात उमलणारी उषा..!!


प्रेम म्हणजे अदृश्य शक्ती

एक सकारात्मक आवेग..!

प्रेम म्हणजे प्रेमच

नियतीने जुळवलेला योग..!!


प्रेम म्हणजे प्रेरणा

अविरत साथ करणारी..!

प्रेम म्हणजे प्रेमच

भावना पुरून उरणारी..!!


प्रेम म्हणजे ममता

कधी मृदु कधी कठोर..!

प्रेम म्हणजे प्रेमच

ओसंडून वाहणारा उर..!!


प्रेम म्हणजे श्वास

निरंतर चालणारा..!

प्रेम म्हणजे प्रेमच

झरा कधी न आटणारा..!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance