कळेल का तुला कधी
कळेल का तुला कधी


कळेल का तुला कधी प्रेम माझं
रक्तबंबाळ, खरचटलेलं
तुझ्या वेडात भरकटलेलं
कळेल का तुला कधी मन माझं
प्रेमात तूझ्या गुरफटलेलं
द्वेषात तुझ्या फरफटलेलं
कळेल का तुला कधी आशा माझी
तूझीच आस लागलेली
तुझीच तहान जागलेली
कळेल का तुला कधी तडफड माझी
तुझी वाट पाहणारी
तुझी काळजी वाहणारी
कळेल का तुला कधी वेदना माझी
काहीही औषध नसणारी
सतत माझ्यावर हसणारी
कळेल का तुला कधी प्रीत माझी
निर्मळ प्रेम करणारी
तूझ्यावरंच मरणारी
कळेल का तुला कधी श्रद्धा माझी
तुला आपली मानणारी
हृदय तुझं जाणणारी