STORYMIRROR

Raakesh More

Tragedy Classics

4  

Raakesh More

Tragedy Classics

कशाला

कशाला

1 min
208

कशाला टेन्शन
घ्यायचं मित्रा 
आंबट बोलून न मिळणारं 
सोडून द्यायचं मित्रा ||0||

मिळणार कसं 
जे नशिबात नसतं 
जे आपलं वाटतं 
तिथेच मन फसतं 
कडवट सत्य गोड समजून 
प्यायचं मित्रा 
आंबट बोलून न मिळणारं 
सोडून द्यायचं मित्रा ||1||

जे मिळालं ते काही 
कमी नाही 
निरखून बघ या 
दिशा दाही 
पुन्हा पुन्हा तिथेच फिरून 
यायचं मित्रा 
आंबट बोलून न मिळणारं 
सोडून द्यायचं मित्रा ||2||

आपल्या वाट्याचं जीवन 
आनंदाने जगायचं 
दुखातही सुख 
हसत बघायचं 
हसत हसत जीवन सोडून 
जायचं मित्रा 
आंबट बोलून न मिळणारं 
सोडून द्यायचं मित्रा ||3||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy