STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy

3  

Raakesh More

Romance Tragedy

प्रेमाची एक्स्पायरी डेट

प्रेमाची एक्स्पायरी डेट

1 min
21

प्रत्येक गोष्ट एकतर

वेळेआधी, वेळेवर किंवा लेट असते 

जास्त प्रेम प्रेम करू नकोस 

प्रेमाची पण एक्स्पायरी डेट असते || 0 ||


प्रेमाच्या नावाखाली जीवन संपवणं 

याला काय अर्थ आहे 

प्रेमासाठी मागे मागे धावणं 

हे सुद्धा वर्तन व्यर्थ आहे 

वेळेनंतर किंमत संपते 

वेळेआधीच मिळते ती खरी भेट असते 

जास्त प्रेम प्रेम करू नकोस 

प्रेमाची पण एक्स्पायरी डेट असते || 1 ||


प्रेम आहे की नाही कोणावर 

दोन भेटीत स्पष्ट करावं 

टिकवायचं असेल तर टिकवावं 

नाहीतर नातं नष्ट करावं 

वेटिंगवर जास्त ठेवू नए 

खऱ्या प्रेमाची स्वीकृती थेट असते 

जास्त प्रेम प्रेम करू नकोस 

प्रेमाची पण एक्स्पायरी डेट असते || 2 ||


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance