आंबट अंगूर
आंबट अंगूर
कशाला टेन्शन घेऊन जगायचं
जीवन क्षणभंगुर आहे
जगायचं तर जगा त्या कोल्ह्यासारखं
ज्याला आंबट अंगूर आहे || 0 ||
जे मिळत नाही अखेर त्याला
आंबट बोलून चिंता सोडा
जे मिळतंय विनासायास
त्याला आपल्याकडे ओढा
दुःखाच्या फांद्यांवर उड्या मारणारं
मन चिंतेचं लंगूर आहे
जगायचं तर जगा त्या कोल्ह्यासारखं
ज्याला आंबट अंगूर आहे || 1 ||
