चल मित्रा वेळ आली
चल मित्रा वेळ आली
भर दुपारी माझ्या जीवनात
आयुष्याची रात्र झाली
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||0||
बालपण अल्लड होतं
खूप खेळलो बागडलो
आज मागे वळून बघता
प्रत्येक क्षणासाठी रडलो
आजचा दिवस ध्यानी नव्हता
कालच्या अल्लड सकाळी
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||1||
गर्दीतही मी एकटा होतो
कुणालाच याचं भान नव्हतं
माझ्या एकट्यापणाकडे
कधी कुणाचं ध्यान नव्हतं
निष्ठेने पूर्णपणे जगलो
भोगलं जे होतं भाळी
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||2||
तारुण्यात साथ द्यायला
कोणीतरी हात देतं
उमेदीच्या दिव्याला
कोणीतरी वात देतं
या हृदयावर फुंकर घालण्या
कधीच कोणी नाही आली
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||3||
जीवनाच्या मेजवानीवर
मस्त ताव मारतात सर्व
सर्वांच्या जीवनात इथे
दिसतं सतत नवं पर्व
सतत रिकामी पाहिली मी
माझ्या जिवनाची थाळी
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||4||
नाही तक्रार निर्मिकाशी
नाही तक्रार जगाशी
आताही या तत्वाबर मी
होतो इथेच मी मघाशी
भावना कोमेजल्या माझ्या
फुटायच्या आधी लाली
चल मित्रा जगाला आता
सोडून जायची वेळ आली ||5||
