STORYMIRROR

Raakesh More

Romance Inspirational

3  

Raakesh More

Romance Inspirational

तुझं प्रेम म्हणजे

तुझं प्रेम म्हणजे

1 min
137

तुझं प्रेम म्हणजे धाग्यांचा गुंता 

सुटता सुटत नाही 

तुझ्या विचारांचं वादळ खरं सांगतो 

मनातून उठत नाही || 0 ||


कच्चे धागे असले तरी 

गाठ मात्र पक्की असते 

जन्मोजन्मीची भेट मात्र 

बंधनात नक्की असते 

हे बंध जुळलेत असे की 

तुटता तुटत नाही 

तुझ्या विचारांचं वादळ खरं सांगतो 

मनातून उठत नाही || 1 ||


तूच दिसतेस डोळ्यासमोर 

तुझीच एक छबी असते 

तूच डोंगर दऱ्यात दिसतेस 

तूच ढगात नभी असतेस 

तुझ्याशिवाय मन दुसरं 

नाव पुटपुटत नाही 

तुझ्या विचारांचं वादळ खरं सांगतो 

मनातून उठत नाही || 2 ||


गुदमरतो जीव माझा 

तू जवळ नसताना 

सारं साध्य झालं वाटतं 

तू मिठीत असताना 

तुझ्या विचारात श्वास खुलतो 

मन घुसमटत नाही 

तुझ्या विचारांचं वादळ खरं सांगतो 

मनातून उठत नाही || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance