STORYMIRROR

Varsha Fatakale warade

Romance Others

4  

Varsha Fatakale warade

Romance Others

मन कातर कातर

मन कातर कातर

1 min
362

मन कातर कातर

किती भुलते स्वप्नात

 घन सावळे भरले

साजे नक्षत्र वनात


उभी सजुनी दारात

वाट सख्याची पाहत

आहे लाजरा बुजरा

राग लटका मनात


होई जीव कासावीस

मना होतसे आभास

येई सजणा घरात

मज घेईल कवेत


गंध गुंतलास माझ्या

पायी पैंजणांची धून

घेई प्राजक्त सुगंध

मन सोनेरी होऊन


आनंद मनी जाहला

सुखी संसार पाहीला

नको होवो त्यास दृष्ट

टळो सर्व हो अनिष्ट


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance