STORYMIRROR

Daivashala Puri

Romance

4  

Daivashala Puri

Romance

शब्द:- सुर्य/चंद्र/प्रेमी

शब्द:- सुर्य/चंद्र/प्रेमी

1 min
325


क्षितिजावरती सुंदर लहरी

आल्या रविकिरणांच्या

गोड स्वरांनी कोकीळ गाते

स्वागत गीत तयांच्या


कोवळी ही चैत्रपालवी

हिरवा नवतीचा रंग

सकाळ प्रहरी वाजवीतो

हा मंजुळ पावा श्रीरंग


ईवल्या ईवल्या पानांवरती

रविकिरणांच्या सुंदर राशी

चित्रकार हा कोण असे मग

रेखाटतो या सुंदर नक्षी ?


सोहळा हा निसर्गाचा

वसुंधरेचे रूप मनोहर

रानफुले अन् वृक्ष वल्ली

नक्षी काढीतो त्यावर दिनकर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance