STORYMIRROR

Daivashala Puri

Others

3  

Daivashala Puri

Others

!! रंग प्रेमाचे !!

!! रंग प्रेमाचे !!

1 min
272

प्रेमाचे हे रंग निराळे 

  राधेचे हे प्रेम आगळे 

    व्यापीलेले विश्व सगळे 

       या प्रितीचा अंत न कळे

प्रेमाचे हे रंग निराळे 


जनाईचे प्रेम पाहूनी 

 आला दारी हरी धाऊनी 

   ओवी गातो जाते धरूनी 

     या प्रेमाने मन विरघळे

प्रेमाचे हे रंग निराळे


वात्सल्य प्रेम आई 

  तान्ह्यास जन्म देई 

   मायेच्या पदराने ती  

     सावली तयाची होई 

       या प्रेमाची किमया न कळे 

प्रेमाचे हे रंग निराळे 


असाअसू दे प्रेम निवारा 

  सा-या विश्वाचा गाभारा 

    आसमंताचा मंत्र प्रेमाचा 

      सकलांच्या ह्रदयी मिसळे 

प्रेमाचे हे रंग निराळे


Rate this content
Log in