STORYMIRROR

Daivashala Puri

Others

4  

Daivashala Puri

Others

कोरो-ना

कोरो-ना

1 min
331

कोरोना विषाणूची महामारी आली 

देशातील जनता भांबावून गेली 


औषध नाही त्यावर ऐकून सैरभैर झाले 

मृत्यूला दारात पाहून सारे घाबरून गेले 


कोरोना विषाणूला घाबरायचे नाही काम 

हातात हात मिळवू नका दुरून करा राम राम 


खोकला आल्यास तोंडावर रूमाल धरावा 

वारंवार साबणाने हात स्वच्छ करावा 


शिंक खोकला असणाऱ्याला दूर ठेवावे 

श्वास घेण्यास त्रास झाल्यास 

लगेच डाॅक्टरकडे जावे


अनावश्यक बाहेर फिरून वाढवू नये संसर्ग 

अन्यथा पहावा लागेल अनेकांना स्वर्ग 


घरातच राहून पाळाव्या सरकारी सूचना 

संसर्ग नाही होणार पळून जाईल कोरोना


साहित्याला गुण द्या
लॉग इन