!! सक्षम ती !!
!! सक्षम ती !!
1 min
317
ती आहे सक्षम
सावित्री जीजाऊ हिरकणी
कल्पना चावला होवून
अवकाशाला घालते गवसणी
ती आहे सक्षम
पुरूषांपेक्षा नाही कुठेच कमी
प्रेमळ आई ते देशाचे रक्षण
विश्वव्यापी राणी लक्ष्मी
नोकरी करून घर ही सांभाळते
करते पाहुणचार
मुलांच्या अभ्यासाचा
तिच उचलते भार
जगातील क्षेत्रसारे
स्त्रीयांनी आज व्यापीले
कर्तृत्वाने आपल्या
यशस्वी करून दाखवले
चला करूया सन्मान
तिच्या हरहुन्नराचा
एकमेकांच्या सहकार्याने
स्त्री-पुरूष समानतेचा