STORYMIRROR

Daivashala Puri

Others

4  

Daivashala Puri

Others

आभार प्रदर्शन

आभार प्रदर्शन

1 min
869

कोरोना विषाणूची महामारी आली 

रोज धावणारी शहरे एकदम स्तब्ध झाली 


जनता कर्फ्यूला दिली सर्वांनी साथ 

ओसाड पडले रस्ते सर्व बसले घरात 


कोरोनाशी चार हात करण्यात 

एकजूटीने सगळे सरसावले 


अत्यावश्यक सेवेतील असंख्य देवदूत 

सज्ज होऊन कर्तव्यावर निघाले 


या देवदूतांचे सर्वांनी आभार मानले 

कुणी टाळी, कुणी थाळी घंटानाद केले 


घंटानादासाठी लोक रस्त्यावर उतरले 

एकत्र गर्दी करून नियम मोडीत काढले 


मनापासून हात जोडूनही आभार मानता येतात 

व्हाॅट्सअॅप,फेसबुक ही आपली मदत करतात 


अनावधानाने का होत नाही चुक झाली खरी 

भान ठेवणे गरजेचे आहे घेणे खबरदारी 

 

साबणाने हात धुवून रूमालाने तोंड बांधू 

संसंर्ग टाळण्यासाठी राहू आपल्या घरात 

सरकारी सुचनांचे पालन करून

महामारीच्या संकटावर करू या मात


Rate this content
Log in